नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकार तर्फे राबवल्या जाणाऱ्या पीएम किसान योजना आणि राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेबद्दल माहिती घेणार आहोत.
नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठ्या निर्णय घेण्यात आलेला आहे.
घेण्यात आलेल्या निर्णयानुसार आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे.
पेरणीसाठी मदत Help for sowing
या दोन्ही हप्त्यांची मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार हजार रुपये जमा होतील ही रक्कम पेरणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने शेतकऱ्यांना आता शेतीतील खर्चासाठी उपयुक्त ठरणार आहे. सध्या हा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याचा ठरणार आहे कारण की आता शेतीमध्ये खरीप हंगाम सुरू झालेले आहे आणि या हंगामामध्ये शेतकऱ्यांना बी बियाणे खत आणि इतर शेती साहित्य तसेच शेतीची मशागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येत असतो.
हा खर्च भागवण्यासाठी शेतकऱ्यांना याची मदत होईल. राज्यामध्ये या दोन्ही योजनांचे लाभार्थी सुमारे 93 लाख 50 हजार शेतकरी आहेत. या दोन्ही योजनेची मिळून या शेतकऱ्यांना चार हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. खात्यामध्ये पैसे जमा होण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे.
DBT द्वारे पैसे जमा होतील Money deposited through DBT.
शेतकऱ्यांना ही मदत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच डीबीटी प्रणालीच्याद्वारे खात्यामध्ये जमा केली जाते. परंतु ही रक्कम जमा होण्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्याला आधार नंबर लिंक असणे आवश्यक आहे. तसेच मोबाईल नंबर सुद्धा लिंक असणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमच्या जमिनीचे डॉक्युमेंट हे ऑनलाईन उपलब्ध असणे सुद्धा आवश्यक आहे.
काही तांत्रिक अडचणींमुळे काही शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मागील काही हप्त्यांचे पैसे जमा झालेले नाहीत. अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता पैसे लवकरच जमा होणार आहेत. आतापर्यंत असणाऱ्या तांत्रिक त्रुटी लवकरात लवकर संपून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
पी एम किसान योजनेची सुरुवात PM Kisan scheme launched
केंद्र सरकारने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पीएम किसान योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षभरात सहा हजार रुपये जमा होतात. हे 6000 रुपये प्रत्येकी दोन हजार रुपये चार महिन्यानंतर असे जमा केले जातात आणि याचाच आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्य सरकारने नमो शेतकरी योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत सुद्धा सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत जेवढे पण पैसे नमो शेतकरी जमा झाले आहेत ते पैसे पी एम किसान योजनेच्या पैशांसोबत जमा केले जातात दोन्ही एकत्र मिळून पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात नेहमी जमा केले जातात.
खात्यात जमा होणार 5000 रुपये Rs 5000 will be deposited in the account.
महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमध्ये 3000 रुपये वाढू देण्याचे घोषणा केलेली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना प्रत्येक हप्त्याला तीन हजार रुपये मिळतील म्हणजेच एकूण नऊ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. अशातच जर दोन्ही योजना म्हणजेच पीएम किसान आणि नमो शेतकरी चे पैसे एकत्र जमा झाले शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये जमा होतील.
फार्मर आयडी अनिवार्य Farmer ID mandatory
केंद्र सरकारने मागील काही दिवसांपूर्वी फार्मर आयडी चा निर्णय घेतलेला होता आणि ही फार्मर आयडी प्रत्येक शेतकऱ्याला अनिवार्य केलेली आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फायबर फार्मर आयडी बनवून घेतलेली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी ती बनवून घ्यावी कारण तिच्याशिवाय आता इथून पुढे कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी चे पैसे यांना सुद्धा मुकावे लागणार आहे
पी एम किसान चा विसावा आपका आणि नमो शेतकरी चा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल याची अद्याप तरी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. परंतु सध्या चालू असलेल्या चर्चा नुसार 15 जून च्या पूर्वी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील. जेणेकरून या पैशांचा उपयोग शेतकरी सध्या लागवडीसाठी बी मिळण्यासाठी करू शकतील.