लाडकी बहीण योजनेचा 11वा हप्ता महिलांच्या बँक खात्यात जमा तुम्हाला आले का चेक करा

ladki bahin may hafta jma नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक मदत व्हावी म्हणून राज्य सरकारतर्फे माझी लाडकी बहीण योजना चालू करण्यात आली. आता या योजनेसंदर्भातच एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये दहा हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता महिलांना अकराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.

अकराव्या हप्त्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आलेले आहेत. 28 मे 2025 रोजी महिला व बाल विकास विभागाकडून काही महत्त्वाचा जीआर जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता महिलांच्या बँक खात्यामध्ये लवकरच अकराव्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत.

काही दिवसांपासून मीडिया आणि इतर ठिकाणी लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा व्यक्त केले जात होते येथे ही योजना बंद होणार म्हणून सर्वच स्तरांमधून माहिती समोर येत होती. परंतु ही योजना निरंतर चालू राहणार आहे. याची स्पष्टता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना आर्थिक मदत ही दर महिन्याला त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. यामध्ये कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

गेल्या काही दिवसांमध्ये आदिवासी विभागाचा निधी वाटण्यासंदर्भात काही चर्चांना उधाण आले होते आणि शंकेचे वातावरण तयार झाले होते. परंतु सरकारने याबाबत सर्व शंका दूर केलेली आहे.

योजनेबद्दल नवीन शासन निर्णय

28 मे 2025 रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या अकरावी हप्त्यासाठी लागणारे निधीची निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार आता 21 ते 65 वर्ष वयोगटातील सर्व लाभार्थी महिलांना त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होणार आहेत.

अकरावा हप्त्यासाठी लागणारा निधी तात्काळ वितरित करण्यात यावा यासाठी विशेष प्रक्रिया राबवली जाणार आहे. आणि लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यामध्ये तो जमा केला जाणार आहे. या योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत व्हीपीडीए प्रणाली द्वारे महिलांच्या बँक खाते जमा केला जाणार आहे.

निधी वितरित करण्यासाठी सर्वप्रथम हा निधी एसबीआय बँकेच्या विशेष खात्यामध्ये जमा केला जाईल आणि नंतर सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खाते जमा केला जाईल. लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत राहावे यासाठी राज्य सरकारने चालू वर्षासाठी 3575 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधी अंतर्गतच आता प्रत्येक महिन्याला महिलांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होतील.

मे महिन्याचा अकरावा हप्ता मिळण्यासाठी उशीर झालेला आहे परंतु आता लवकरात लवकर महिलांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील.
यापुढे अजून जास्त विलंब होणार नाही असे सरकारी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेले आहे.

योजनेचे पात्रता निकष

मित्रांनो आता आपण लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे मुद्दे राज्य सरकार तर्फे जारी करण्यात आलेले आहेत. या संदर्भात माहिती घेऊ.

  • या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे वय हे 21 ते 65 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • त्यानंतर तुमचे आधार कार्ड हे बँक खात्याशी संलग्न असणे सुद्धा आवश्यक आहे.
  • तुमचे बँक खाते सक्रिय आहे का नाही याची वेळोवेळी तपासणी करा जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे लवकर जमा होतील.

राज्य सरकारने सांगितलं तर्फे या योजनेमध्ये सध्या तरी कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. तसेच ही योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये बंद होणार नाही. ही योजना यशस्वीपणे राबवण्यासाठी राज्य सरकार पाहिजे ते पाहून योग्य ते पाऊल उचलले जाणार आहे.

राज्य सरकार तर्फे अजून तरी अकराव्या हप्त्याचे अधिकृत तारीख स्पष्ट करण्यात आलेले नाही. परंतु लवकरच आता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्यातर्फे ही माहिती लवकरात लवकर पब्लिक केली जाईल असे सांगण्यात येत आहे.

ही योजना यशस्वी राबवण्यासाठी पाहिजे ते पाऊल उचलले जात आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहिजे त्या सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत, पैसे पडल्यानंतर तुमच्या बँक खात्यात कडून तुम्हाला एसएमएस द्वारे याची माहिती दिली जात आहे.

Leave a Comment