Domestic cylinder rates नमस्कार मित्रांनो आज आपण गॅस सिलेंडरच्या दरांबद्दल माहिती घेणार आहोत. गॅस सिलेंडरचे दर हे जिल्ह्यानुसार बदलत असतात आणि या सिलेंडरचे किमती दर महिन्याच्या एक तारखेला जारी केल्या जातात. ज्या भारतामध्ये पेट्रोलियम कंपन्या आहेत त्या दर महिन्याच्या एक तारखेला नवीन दर मार्केटमध्ये आणतात. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला रेट जाहीर झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलेला असतो. कधी रेट वाढलेले असतात तर कधी कमी झालेले असतात.
सिलेंडरचे दर LPG cylinder rates
गॅस सिलेंडरचे दर हे विविध घटकांवर अवलंबून असतात जसे की ट्रान्सपोर्टेशन जागतिक मंदी जागतिक बाजार दळणवळण. मित्रांनो एक जून 2025 रोजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर झालेले आहेत. या गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत. महिन्याच्या सुरुवातीला सिलेंडरच्या दारांची घोषणा करण्यात आली आणि सिलेंडरच्या दरांमध्ये मोठी घट करण्यात आलेली आहे. सध्या वाढत्या महागाईच्या काळामध्ये सिलेंडरची घसरण होणे, हे खूप चांगले संकेत मानले जात आहेत.
मित्रांनो आपण जर नीट पाहिले तर तुम्हाला कळेल महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सिलेंडरचे दर हे वेगवेगळे असतात यामागील कारण म्हणजेच डिलिव्हरी चार्ज म्हणजेच वाहतूक चार्ज आणि स्थानिक कर या गोष्टींवर त्या जिल्ह्याचे दर अवलंबून असतात. काही जिल्ह्यांमध्ये सिलेंडर पोहोचवणे अवघड असते त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढतो किंवा गॅस स्टेशन में जिथे आहे तिथून समोरचे जिल्ह्याचे अंतर जास्त असल्याचे नंतर ट्रान्सपोर्टेशन चा खर्च वाढला जातो अंतर वाढले की खर्च वाढतो.
मित्रांनो गॅस सिलेंडरच्या दारांमध्ये दहा वीस रुपयांचा जरी फरक झाला तरी जनसामान्यांच्या आयुष्यावर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. गॅस दरांमध्ये थोडा जरी बदल झाला तरी कुटुंबाच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर चांगला फायदा होतो. गॅस सिलेंडरचे जाहीर झालेले नवीन दर पाहण्यासाठी तुम्ही भारत गॅस एचपी गॅस इंडियन गॅस अशा विविध गॅस कंपन्यांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा नवीन जर चेक करू शकता.
घरगुती सिलेंडरचे दर Domestic cylinder rates
व्यवसायिक गॅस सिलेंडरचे किमतींमध्ये कपात करण्यात आलेले आहेत परंतु घरगुती सिलेंडर मध्ये कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. घरगुती सिलेंडरचे दर जशी मागच्या महिन्यात होते त्याचप्रमाणे ह्या महिन्यात सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. तेल कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरच्या दारांमध्ये बदल केला नाही. या सिलेंडरची किंमत दिल्लीमध्ये 803 रुपये एवढी आहे तर कोलकत्ता मध्ये 829 रुपये एवढी आहे आणि मुंबईमध्ये 802.50 एवढी आहे तर चेन्नईमध्ये 818.50 रुपये एवढी आहे.
मित्रांनो आपण वर पाहिलं तर मुंबईमध्ये सर्वात कमी दर आहेत कारण मुंबईमध्ये गॅस स्टेशन जवळ असल्यामुळे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट खर्च कमी येतो आणि दर कमी राहतात चेन्नईमध्ये ट्रान्सपोर्ट खर्च सगळ्यात जास्त येतो त्यामुळे तिथे दर सुद्धा जास्त देण्यात आलेले आहेत.
Domestic cylinder rates by district जिल्ह्यानुसार घरगुती सिलेंडरचे दर
शहर |
दर |
अहिल्यानगर | 816.50 |
अकोला | 823 |
अमरावती | 836.50 |
छत्रपती संभाजीनगर | 811.50 |
भंडारा | 863 |
बीड | 828.50 |
बुलढाणा | 817.50 |
चंद्रपूर | 851.50 |
धुळे | 823 |
गडचिरोली | 872.50 |
गोंदिया | 871.50 |
मुंबई | 802.50 |
हिंगोली | 828.50 |
जळगाव | 808.50 |
जालना | 811.50 |
कोल्हापूर | 805.50 |
लातूर | 827.50 |
मुंबई शहर | 802.50 |
नागपूर | 854.50 |
नांदेड | 828.50 |
नंदुरबार | 815.50 |
नाशिक | 806.50 |
धाराशिव | 827.50 |
पालघर | 814.50 |
परभणी | 829 |
पुणे | 806 |
रायगड | 813.50 |
रत्नागिरी | 817.50 |
सांगली | 805.50 |
सातारा | 807.50 |
सिंधुदुर्ग | 817 |
सोलापूर | 818.50 |
ठाणे | 802.50 |
वर्धा | 863 |
वाशिम | 823 |
यवतमाळ | 844.50 |
मित्रांनो वरील तक्त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामधील सर्व जिल्ह्यांची सिलेंडरचे दर देण्यात आलेले आहेत. वरील तक्त्यानुसार सर्वात कमी दर हे मुंबई शहर या ठिकाणी आहेत. तसेच आपण पाहिले तर नागपूर मध्ये 14.2 किलो सिलेंडरची किंमत ही 854 एवढी देण्यात आलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सोलापूर मध्ये 818.50 रुपये यवतमाळ जिल्ह्यामध्ये 844.50 एवढी किंमत आहे.
त्यानंतर नागपूर मध्ये 854.50 एवढी किंमत आहे गोंदिया मध्ये आणि गडचिरोली मध्ये सर्वात जास्त किमती आहेत गडचिरोलीमध्ये 872.50 एवढी किंमत आहे आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये 871.50 रुपये एवढी किंमत देण्यात आलेली आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 863 रुपये प्रति सिलेंडर एवढी किंमत आहे या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ट्रान्सपोर्टेशन खर्च जास्त असल्यामुळे सिलेंडरची किमती जास्त आहेत.