2 free cows and buffaloes नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकार नेहमीच शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असतं. अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकारने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आणलेली आहे. या योजनेचा लाभ घेतल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे उत्पन्नात वाढ होणार आहे आणि ते स्वावलंबी बनणार आहेत.
शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी सरकार नेहमीच प्रोत्साहन देत राहतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच दूध उत्पादन करण्यासाठी गाय व म्हैस विकत घेण्यासाठी सुद्धा अनुदान दिले जाईल. या योजनेच्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दोन दुधारू जनावरे दिले जातील.
या जनावरांमध्ये जी जास्त गाय किंवा म्हैस जास्त दुधाचे उत्पादन देईल अशा गाईंची निवड करता येईल. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध होईल उद्योगधंद्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
ऑनलाईन अर्ज Apply Now
या योजनेसाठी तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. AH-MAHABMS या वेबसाईटचे अंतर्गत तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. किंवा याच वेबसाईटचे मोबाईल अँड्रॉइड एप्लीकेशन सुद्धा आहे तुम्ही ते डाऊनलोड करून सुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज पद्धती असल्यामुळे तुम्ही अर्ज कधीही करू शकता तसेच अर्ज करण्याची पद्धत सोपी आहे तुम्हाला येथे कोणत्याही सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची गरज नाही. ऑनलाइन अर्ज पद्धती उपलब्ध करून दिल्याने तुमचा टाईम आणि खर्च दोन्ही वाचेल.
प्राधान्य क्रम आणि लाभार्थी निवड Priority order and beneficiary selection
- ही योजना राबवताना काही गटांना प्राधान्य देण्यात आलेला आहे. जसे की महिलांचा बचत गट असेल, तर त्यांना सर्वात आधी प्राधान्य दिले जाईल.
- गावातील अर्थव्यवस्था बळकट करणे त्याचबरोबर महिला सशक्तिकरण करणे हा सुद्धा या योजनेचा महत्त्वाचा घटक आहे.
- त्यानंतर लहान शेतकरी ज्यांच्याकडे दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- शिक्षित परंतु बेकार असलेले तरुण तसेच रोजगार कार्यालयात नोंदणीकृत असलेले तरुण वर्ग अशांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल.
- या योजनेअंतर्गत फक्त ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. शहरी भागातील शेतकऱ्यांना याचा पात्र लाभ दिला जाणार नाही.
- खेडोपाड्यातील आर्थिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी या योजनेची निर्मिती करण्यात आली आहे.
अनुदानाची रक्कम Grant amount
ही योजना राबवताना गाय व म्हैस खरेदी करण्यासाठी एक निश्चित स्वरूपाची रक्कम राज्य सरकारने निश्चित केलेली आहे.
- जर तुम्ही गाईंची जोडी विकत घेतली तर यासाठी तुम्हाला एक लाख 40 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल आणि जर तुम्ही मशीन ची जोडी विकत घेतली तर तुम्हाला यासाठी एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळेल.
- यामध्ये तुम्हाला प्रत्येक गाईची किंमत ही 70 हजार रुपयांपर्यंत तर मशीन ची किंमत 80 हजार रुपये पर्यंत खरेदी करण्यासाठी मोबा देण्यात आलेली आहे.
- सरकारच्या या योजनेनुसार अनुसूचित जातीतील लाभार्थ्यांना खर्चाचे एकूण 75 टक्के अनुदान दिले जाईल आणि इतर सामान्य वर्गातील लाभार्थ्यांना खर्चाचे एकूण पन्नास टक्के अनुदान दिले जाईल. हे अनुदान मिळाल्याने गाय व म्हैस खरेदी करण्यासाठी हातभार लागेल.
आवश्यक कागदपत्र
या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही तुम्हाला आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील ते खालील प्रमाणे आहेत.
- आधार कार्ड
- अलीकडील तुमचा पासपोर्ट साईज फोटो
- सातबारा आणि आठ-अ जमीन कागदपत्रे
- जात प्रमाणपत्र
- बँक पासबुक
- वयाचे प्रमाणपत्र
- रेशन कार्ड
- कुटुंबाचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक प्रमाणपत्र
- उपलब्ध असल्यास रोजगार हमी नोंदणीचा पुरावा
नियम
या योजनेसाठी सरकारतर्फे काही नियम ठरवण्यात आलेले आहेत. ज्या व्यक्तींनी 2021 22 आणि 23 मध्ये अशाच प्रकारच्या योजना साठी अर्ज केला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करायची आवश्यकता नाही. अर्ज करताना तुम्हाला संपूर्ण माहिती अचूक भरायचे आहे. जनावरे मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना सरकारसोबत एक करार करावा लागेल. ज्याच्यामध्ये नियम व अटी दिलेला असतील. तसेच तुम्हाला या योजनेचे लाभ मिळाल्यानंतर सरकार तुम्हाला गोटा बांधण्यासाठी, तसेच चारा चारा तयार करणाऱ्या करण्यासाठी लागणारी, कुट्टी मशीन, दाना साठवण्यासाठी लागणारे गोदाम सुविधा, तसेच तीन वर्षाचा संपूर्ण विमा संरक्षण अशा विविध गोष्टींचा फायदा सुद्धा तुम्हाला होणार आहे.